Share

उर्मिला मारतोंडकर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्रींनकडून चंद्रमुखी देवी यांचा निषेध

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये एका 50 वर्षांच्या महिलेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पीडित महिलेच्या घरी गुरुवारी राष्ट्रीय महिला सदस्य चंद्रमुखी देवी पोहचल्या होत्या त्यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी या महिलेची विचारपूस केली. मात्र, त्यानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक विधान केले.

त्यांचे म्हणणे आहे की, ही पीडित महिला जर संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर ही घटना घडली नसती. चंद्रमुखी देवीच्या या विधानानंतर बॉलिवूड अभिनेत्रीनी देखील संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर चंद्रमुखी देवी यांच्या या विधानाचा व्हिडिओ रिट्विट करत तापसी पन्नूने लिहिले की, ‘जर देशात या मानसिकतेचे लोक नसते तर अशी घटना घडली नसती.’

तापसीच्या ट्विटनंतर उर्मिला मातोंडकरने ट्विट केले की, ‘ही मानसिकता आतमधून बदलण्याची आवशक्ता आहे. तोपर्यंत काही बदल होण्याची शक्यता नाही आणि एक महिला दुसऱ्या महिलेला गुन्हेगार कसे म्हणू शकते. हे अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!