🕒 1 min read
गांधीनगर: गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते. माधव सिंह सोलंकी यांच आज निधन झालं ते ९४ वर्षाचे होते. सोलंकी यांचा जन्म ३० जुलै १९२७ ला एक कोळी परिवारात झाला होता. सोलंकी कॉंग्रेस चे एक मोठे नेते आणि देशाचे परराष्ट्र मंत्री राहिले आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव सिंह सोलंकी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी म्हटलं कि, सोलंकी यांनी गुजरातच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली. आपण त्यांच्या निधनाने दुखः व्यक्त करत असल्याच यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सोलंकी यांचे पुत्र भारत सोलंकी यांच्याशी संपर्क साधून भावना व्यक्त केल्या.
Shri Madhavsinh Solanki Ji was a formidable leader, playing a key role in Gujarat politics for decades. He will be remembered for his rich service to society. Saddened by his demise. Spoke to his son, Bharat Solanki Ji and expressed condolences. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
गुजरातच राजकारण आणि 1980 ला जातीय समीकरणं सांधून राजकारणात येणारे माधव सिंह सोलंकी KHAM थेरीचे जनक मानले जातात KHAM म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम. यामुळे गुजरातच्या राजकारणात कित्येक दिवस उच्च्वार्नियाचं वर्चस्व कमी झाल होत.
माधव सिंह सोलंकी व्यवसायाने वकील होते. आणीबाणी मध्ये १९७७ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तर १९८० च्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मोठ बहुमत मिळालं. यावेळी सोलंकी यांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आरक्षण आणल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तर आरक्षणामुळे सोलंकींना KHAM जातींचे समर्थन तर मिळाले मात्र पटेल, ब्राह्मण आणि बनिया या उच्च जातींचा विरोध देखील झाला.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
- लसीकरणाची खूण म्हणून संबंधितांच्या बोटांवर शाई लावावी – राजेश टोपे
- ‘टिवटिव’ कायमची बंद ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरची मोठी कारवाई…
- भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात
- रोहितच्या नादात चाहत्याने काढली अर्धी मिशी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

