Share

योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी

Published On: 

पुणे : शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांकाजी गांधी यांना उत्तर प्रदेशातील भ्याड योगी आदित्यनाथ सरकारने पोलीसांकरवी ताब्यात घेतले ही कृती अत्यंत निषेधार्ह असून दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षांचे मुख्य मंत्री, नेते तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरमध्ये प्रवेशासाठी प्रतिबंध केला जात आहे, ही बाबही संतापजनक असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांवर रविवारी गोळीबार करण्यात आला, त्यात १० जण मृत्यूमुखी पडले. मोदी सरकारच्या  कृषी कायद्याच्या विरोधात गेले काही महिने शांततेच्या मार्गाने शेतकरी लढा देत आहेत. पोलीसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने चालविला आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

गोळीबारात् बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि आंदोलक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी लखीमपूरला जाणार होत्या. परन्तु योगी सरकारने त्यांना पोलीसांमार्फत ताब्यात घेऊन रोखले. ही कृती भ्याडपणाची आहे. अशा दडपशाहीपुढे प्रियंकाजी झुकणार नाहीत याची खात्री आहे. आणि देशातील सर्व काँग्रेसजन त्यांच्या पाठिशी आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!