Share

धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊ नका – संजय राऊत

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘घाईघाईने यासंदर्भात कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत. अर्थात याचे अधिकार हे शरद पवार यांचेच आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे. याक्षणी धनंजय मुंडे यांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राऊतांची भाजपवर आगपाखड !

‘काही लोकांनी स्वतःच कोर्ट व कायदा असल्याचं ठरवून कोणाला आरोपी करायचं, कोणाला पदावरून खेचायचं हे परस्पर ते ठरवून टाकतात,’ असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी भाजपवर लगावला आहे. कोणीही उठेल आणि आरोप करेल. मग विरोधी पक्ष राजीनामा मागत बसेल, महाराष्ट्रात या प्रवृत्तीचा बिमोड व्हायला पाहिजे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी सूर्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्याही काचेच्या घरावर पडून काच महालावर कोसळेल. हे बेताल झालेल्या विरोधी पक्षासाठी लागू आहे. आपण सुद्धा राजकारणात आहोत आणि हमाम मे सब नंगे है याचं भान विरोधी पक्षाने ठेवावं. नीतिमत्ता आम्हाला शिकवू नये,’ असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!