Share

‘मालमत्ता करवाढ म्हणजे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार’ ; भाजपचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेली प्रस्तावित मालमत्ता करवाढ सन २०२१ ते २०२५ या कालावधीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, तसा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केल्याने हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत सेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती.

प्रत्यक्षात या करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ झाला असून, उर्वरित कर मुंबईकरांना भरावा लागतो आहे. त्यामुळे सध्या जनसामान्यांमध्ये सध्या कमालीची नाराजगी आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून भाजपने शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावास भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तीव्र विरोध केला आहे.

कोरोना काळात आर्थिक मंदीच्या नावाखाली धनाढ्य विकासकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सूट, कंत्राटदारांना सुरक्षा ठेवीमध्ये 50 टक्के सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात सूट देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने सामान्य मुंबईकरांना कोणतीही सूट मालमत्ता करात दिली नाही. याउलट मोठा गाजावाजा करत 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करात संपूर्ण सूट देण्याचे वचन जाहिरनाम्यात देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. आज राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, याला दीड वर्षे झाली तरी सर्वसामान्य मुंबईकरांच्या 500 चौरस फुट घराला मालमत्ता करात माफी मिळालेली नाही.

कोविड, लॉकडाऊनमुळे आणि आर्थिक मंदीमुळे त्रस्त उद्योजकांना सवलती देताना सर्वसामान्य मुंबईकरांनाही मालमत्ता करात सूट द्यावी अशी लेखी मागणी भाजपने केलेली आहे. याचा कोणताही विचार न करता मालमत्ता करवाढ करण्याचा हा प्रस्ताव म्हणजे मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असे टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!