🕒 1 min read
औरंंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (घाटी) हवेवर ऑक्सिजन निर्मितीचा एक प्रकल्प मंजूर केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा संशोधन संस्थेअंतर्गत या ऑक्सिजन प्रकल्पाचे होत असून त्याच्या उभारणीची जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे दिली आहे. देशातील एकूण चारशे शहरांमध्ये या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे. घाटीत या प्रकल्पानंतर दोनशे जम्बो सिलिंडर प्रति दिवसाला ऑक्सिजन मिळणार आहेत. त्यासाठी सव्वा कोटी इतका खर्च येणार आहे. पंधरा दिवसांत काम सुरू होईल, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, अभियंता अनिल कुलकर्णी यांनी या प्रकल्पाबाबत डॉ. कराड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आठ ते पंधरा दिवसांत याचे सिव्हिलचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यांनतर आगामी पंधरा दिवसांत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. औरंगाबादेत बाहेरच्या जिल्ह्यांतून रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयातही दुसरा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी डॉ. कराड यांनी या अधिका-यांकडे केली. डॉ. कराड यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे ऑक्सिजन प्लँट उभारणीबाबत यापूर्वीच मागणी केली होती, ती मान्य झाली. घाटीत होणारा प्लँट नवीन असून मेल्ट्रॉनमधला नसल्याचे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.
घाटीत सध्या ७५० बेड तयार आहेत. तिथे सध्या २० ते २२ मेट्रिक टन रोज ऑक्सिजन लागतो. या नियोजित हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पातून ६० क्यु.मी. प्रतितास असे (तीन संच) बसवण्यात येणार आहेत. हे तीन प्लँट बसल्यास साधारण एका प्लँटमधून २०५ जम्बो सिलिडर इतका ऑक्सिजन मिळू शकतो. तर तीन प्लँटमधून ६१५ सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होईल. घाटीला एका तासाला शंभर सिलिंडर लागतात. हा प्लँट बसल्यास घाटीस सहा तास इतर लिक्विड ऑक्सीजनची गरज लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
- राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…


