Share

प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – जगभरात आणि आता भारतात शिरकाव केलेल्या कोरोनामुळे शासकीय पातळीवर खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. कुठल्याही ठिकाणी गर्दी टाळावी अशी सूचना सरकारच्या आरोग्य मंत्रालयकडून नागरिकांना देण्यात आल्या आहे.

आता रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपट ज्यात अक्षय कुमार , अजय देवगण , कतरिना कैफ आणि रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट आहे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. अभिनेता अक्षय कुमार याने ट्वीट करत या बद्दलची माहिती दिली आहे.

अक्षयने या संदर्भात ट्वीटमध्ये म्हणाल आहे ,’कारण आपली सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे , त्यामुळे काळजी घ्या’. आपल्या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यात प्रदर्शन पुढे ढकलण्यात अलायची माहिती दिली आहे.

यात लिहलं आहे,’सुर्यवंशी हा चित्रपट आम्ही वर्षभर खूप मेहनत घेऊन तयार केला आहे. हे फिल्म आम्ही आमच्या प्रिय प्रेक्षकांसाठी बनवली आहे. परंतु देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी म्हणून प्रदर्शन पुढे ढकलत आहोत. आपण सर्व मिळून याच्यावर मात करू. तोवर काळजी घ्या – टीम सूर्यवंशी.’

अक्षय कुमार अभिनित ‘सूर्यवंशी’  हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार होता.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!