Share

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाच्या वतीने होणार राज्यभर आंदोलन

Published On: 

पुणे  – मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण ,अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे,यासह इतर मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा संकल्प दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.त्याची सुरुवात 21 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा येथून होणार असल्याचे जाहीर केले .

ते म्हणाले की ,अलीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण ,धनगर आरक्षण याबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे. परंतु मातंग समाजाच्या आरक्षणाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केला आहे .त्यामुळे हे सरकार मातंग समाजाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेत आहे त्यामुळेच याचा निषेध करण्यासाठी येत्या 21 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची सुरवात पुण्यातून करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले.

या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टी चि स्थापना करावी , सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे ,अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे ,दलित महिलांवरील  अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा.या प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर  आंदोलन करण्यात येणार आहे.  या पत्रकार परिषदेस महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे,उपाध्यक्ष लक्ष्मी पवार ,शहरादयक्ष जयंत जाधव ,विकास भोंडवे ,खंडू पवार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!