Share

होम आयसोलेशनमध्ये अडचणी? Don’t Worry; औरंगाबाद महानगरपालिकेकडून संपर्क क्रमांक जारी..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहरात कोरोना रूग्णांनी शतक पार केले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका सज्ज झाली असून मनपा ‘कोरोना वॉर रुम’ अद्ययावत करण्यात आली आहे. यामध्ये इतर कामांसोबत टेस्टींग, लसीकरण व होम आयसोलेशन रुग्ण मॉनिटरींगवर भर देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे विशेषतः होमे आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्यास मनपाकडून दोन प्रशिक्षित डॉक्टरांचे नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल.

सध्या शहरामध्ये एकुण २६ लॅब कार्यरत आहेत. यात २ सरकारी व ४ खासगी लॅब आहेत. औरंगाबाद मनपाच्या २८ स्वॅब कलेक्शन टिम्स शहरातील विविध भागात आरटीपीसीआर तपासण्या करत आहेत. मनपातर्फे विविध खाजगी रुग्णालयांना टेस्टींग किट्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. १५ ते १८ वर्ष या वयोगटासाठी आरोग्य केंद्र निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील विविध लॅबमधून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांची यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे, प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णास फोन करुन कुठल्या फॅसिलिटीमध्ये भरती होत आहेत किंवा होम आयसोलेशन मध्ये राहणार असल्याबाबतची विचारणा करुन अपडेट करणे.

सध्या जास्तीत जास्त रुग्ण होम आयसोलेशन मध्ये राहतील. अशा रुग्णांनी घाबरुन जावू नये व त्यांचे मॉनिटरींग व्हावे या दृष्टीने त्यांना वॉर रुम मधून दिवसातून दोन वेळा फोन करून तब्यतेची चौकशी करुन मॉनिटर करण्यात येणार आहे. होम आयसोलेशन दरम्यान सौम्य लक्षणे आढळुन आल्यास त्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत व यासाठी दोन प्रशिक्षित डॉक्टर्स रुग्णांना सल्ला देतील.

होम आयसोलेशन मधील रुग्णांनी येथे संपर्क करा-

• ९१६८६४७८३७ (रात्री १० ते दुपारी १२)

• ९१६८६४७८३९ (दुपारी १२ ते रात्री १०)

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!