सातारा : साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरून दोन्ही शिंदे आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपासून महेश शिंदे सातत्याने शरद पवार आणि रयत शिक्षण संस्था यांच्यावर टीका करत असून यावर आता शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शशिकांत म्हणाले की,’शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती हे आधी तपासून पहावं. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल.’ तसेच शरद पवारांचं रयत शिक्षण संस्थेसाठी योगदान किती आहे याचा आधी त्यांनी अभ्यास करावा, असा सल्लाही यावेळी शशिकांत यांनी दिला.
दरम्यान, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शरद पवार शैक्षणिक व आर्थिक मदत करत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच इतर बाबतीत मदत करतात. पण, ते याचा कधीही गवगवा करत नाहीत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेवर बोलताना रयतेचा परिवार हा जिल्हा पुरता नसून महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे, याचे भान ठेवावे. केवळ शरद पवार यांचा पाठिंबा आहे, म्हणून ही संस्था आधुनिकतेच्या पायावर उभी असून यशस्वी वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना आपली उंची तपासावी, असेही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘…या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते’, आयआयटी प्राध्यापकाचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

