मुंबई : पोलिसांच्या तत्परतेची अजून एक प्रचीती मुंबईत आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला मुंबई सागरी पोलिसांच्या एका पथकानं आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे.
‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समुद्रातून बोटीनं एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. अशाच एका बोटीतून प्रवास करत असतानाच समुद्राच्या लाटेच्या जोरदार धडकेमुळे एक महिला पर्यटक समुद्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं सागरी सुरक्षा दल तत्पर झाले. आणि स्पीड बोटीनं घटनास्थळ गाठलं. आणि दोरखंडच्या साहाय्याने या महिलेचा जीव वाचवण्यात आला.
मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे या महिलेचा जीव वाचला. अन्यथा नसत्याचे झाले असते. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. याचा व्हिडिओदेखील सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती


