🕒 1 min read
मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यावरुन चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. ‘राज्यातील शाळा बंद आणि बार सुरु, महाविकास आघाडीला क्लास पेक्षा ग्लास महत्वाचा’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊंवर निशाणा साधत ‘सदाभाऊ यांच्या बुद्धीची किव येते’. अशी टीका केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
@KishoriPednekar मा. महापौर मॅडम तुमच हे सरकार खूप शिकलेलं आहे.
तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो आणि बिल्डरांना कर माफी देऊन, विदेश दारूवरचा कर 150% कमी करून प्रगतिशील महाराष्ट्राला हेवा वाटावा असं राजकीय यश आपण संपादन केलं आहे. pic.twitter.com/gjgQfL353v
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 10, 2022
याबाबत सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणतात, ‘महापौर मॅडम तुमच हे सरकार खूप शिकलेलं आहे. तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो आणि बिल्डरांना कर माफी देऊन, विदेश दारूवरचा कर १५० % कमी करून प्रगतिशील महाराष्ट्राला हेवा वाटावा असं राजकीय यश आपण संपादन केलं आहे.’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे साम्य दाखवणे ते अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे. इतर राज्यांमध्ये जी नियमावली आहे, तीच महाराष्ट्रात असून Who च्या गाईडलाईननुसार एसोपी ठरतो. परत जुन्या कढीला उत आला आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
- गोवा भाजप पर्रीकरांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही म्हणत ‘या’ मंत्र्याने ठोकला भाजपला रामराम
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
- मोदींच्या ‘सुरक्षेतील त्रुटी’ला जबाबदार कोण? हायकोर्टात आज होणार सुनावणी
- “…ब्युटी पार्लर सुरु करण्याबाबत जादूची कांडी फिरली आणि ठाकरे सरकारने यू टर्न घेतला”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
