औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद होत्या. सोमवारपासून या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या ओमायक्रोनने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. असे असतांनाच शहरातील एका खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक पॉझिटीव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. मात्र यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने काही नियम व अटींसह शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये औरंगपुरा परिसरात असलेल्या एका शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील इतर शाळांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने शाळा सुरू करण्यात घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहेत.
सुंदर शाळेतील शिक्षकाचे वय सत्तावन्न वर्षे असून ते नुकतेच एका राज्यातून शहरात आले होते. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्वांचा चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी या शिक्षकाचा अहवाल निगेटिव आला. मात्र दुसर्या राज्यातून आल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
या शिक्षकाला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसून त्यांच्यावह होम आयसोलेशनमध्ये उपचारही सुरु करण्यात आले आहेत. या शिक्षकांचे नमुने देखील जीनोम सिक्वेन्सींग साठी पाठवले जाणार आहेत. शाळेतील इतर शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पुन्हा एकदा सात दिवसांनी या ससर्वांची चाचणी केली जाणार आहे. मात्र गेल्या दोन दिवसात शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थी आणि स्टाफची कोरोना चाचणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य


