Share

पृथ्वीराज चव्हाणांचं ठरलं ! उदयनराजे विरोधात लढणार नाही

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सातारच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण पृथ्वीराज चव्हाण हे कराड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून उद्याच कॉंग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सातारचे माजी खा. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामात भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे साताऱ्यात पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण उभं राहणार असल्याची चर्चा होती. मात्र कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांना लोकसभेचा विचार न करता आमदारकीच लढविण्याचे सुचविल्यानंतर त्यांनी विधानसभेतच लढण्याचे ठरविले आहे.

दरम्यान : विधानसभा निवडणुक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्याप्रमाणे कॉंग्रेसनेही आपल्या निश्चित उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामध्ये बाळासाहेब थोरात – संगमनेर, विजय वडेट्टीवार – ब्रम्हपुरी, पृथ्वीराज चव्हाण – कराड, विश्वजित कदम – पलूस कडेगाव आदि विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178619577812447233?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178619392134766592?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178616083957157889?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!