नवी दिल्ली : संसदेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा मिळणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, या विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. ‘आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन फडणवीस सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलं होतं. पाच वर्षे त्यांचे सरकार चालले. ५ वर्षांत कॅबिनेटच्या अनेक बैठका झाल्या. अद्याप धनगरांना आरक्षण मिळालेलं नाही. पण आदिवासींचं आणि ओबीसींच आरक्षण काढून मराठा सामाजाला द्यावं, असं आम्हाला अजिबात नकोय. प्रत्येकाला हक्क देणं ही मायबाप सरकारची जबाबदारी आहे,’ असं सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या आभार म्हणतानाच ५० टक्क्याची अट शिथिल करण्याची देखील मागणी केली. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन घटनादुरुस्तीची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केल्याने सर्वांचे आभारी आहोत. पण आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे अडचणी येत आहेत. यामुळे ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी. ही समस्या दूर झाली तर केंद्राचा आणि राज्याचाही प्रश्न सुटेल. सर्वांचं भलं होईल,’ अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
‘राजकारणापासून वर उठून महाराष्ट्र सरकारला मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यासोबतच, महाराष्ट्रातून दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, असा आरोप सुळे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केला असून त्या ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं तर योग्य ठरेल असं म्हटलं आहे. तसंच शोषित, पिडीत वंचितांना यांच्यासाठी सरकारने महागाई कमी करावी. नोकऱ्या उपलब्ध करून द्यावात, असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करणार; राज्याच्या मुख्य सचिवांच विधान
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
- ‘मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत हे आता कळले’
- ‘मंत्रालयात दारू ; ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची’- देवेंद्र फडणवीस


