Share

प्रीतम मुंडे म्हणाल्या, ‘जो तो उठतो मराठा आरक्षणाबद्दलच बोलतो’; आता संभाजीराजेंनी दिलं उत्तर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा मिळणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना विरोधकांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरून आरोप केले. विरोधकांच्या टीकेला आणि आरोपांना भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना त्यांनी, ‘प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही,’ असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

मुंडेंच्या या विधानावर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेतो ते काम माझं सुरू राहील. ओबीसी समाजासोबत आम्ही काम करतोय. ओबोसींचे अनेक नेते मला भेटले. आमच्यावर कधी लक्ष देणार असंही ते म्हणाले. आम्ही सर्व एकच आहोत,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. यासोबतच, मी दोन तीन अमेडमेन्ट सुचवल्या आहेत. हा पहिला टप्पा आहे आरक्षण मिळवून देण्याचा. 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये SEBC मध्ये आरक्षण देता येईल. या विधेयकाचं स्वागतच आहे, असं देखील ते म्हणाले.

प्रीतम मुंडे संसदेत नेमकं काय म्हणाल्या होत्या ?

१०२ व्या घटना दुरुस्तीबाबत काल संसदेत चर्चा सुरु असताना प्रीतम मुंडे यांनी भाषण केलं. यावेळी त्या म्हणाल्या, ‘अनेक लोकांची मतं ऐकली, मी विचार करतेय, या बिलने काय साध्य केलं? तर राज्यांचे अधिकार होते, इच्छा होती, आपल्या राज्यातील OBC आणि सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासची जी सूची आहे ती त्यांनी बनवावी आणि ती मेंटेन करण्याचा अधिकार त्यांना मिळावा. ते आता साध्य होत आहे. पण मी बघतेय, इथे सगळे जण फिरुन फिरुन येतायेत आणि मराठा आरक्षणावरच बोलत आहेत, दुसरा कोणता विषयच मांडलेला मला दिसत नाही. म्हणून मला काही गोष्टी मला मांडायच्या आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!