🕒 1 min read
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. येत्या 27-27 मार्च रोजी मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशाचा 50 वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
कोरोनाचे संकट येण्याआधी मोदी यांनी विविध देशांचे दौरे करून भारताचे विविध देशांशी असणारे व्यवसायिक तसेच राजनैतिक संबंध दृढ करण्यावर चांगलाच भर दिला होता ज्याचा फायदा मोठ्याप्रमाणावर भारताला भविष्यात होईल अशी शक्यता आहे.आता कोरोना संकट टळले नसले तरीही काही प्रमाणात कमी झाले असल्याने मोदी आता या दौऱ्यावर जाणार आहेत.
बऱ्याच कालावधी नंतर मोदींचा हा परदेश दौरा असल्याने या दौऱ्यात मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान,1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.यानंतर नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान,भारताने बांगलादेशाला आतापर्यंत कोरोनाचे 90 लाख डोस दिले आहेत. भारताकडून आतापर्यंत कोणत्याही इतर देशांना पाठवण्यात आलेले हे सर्वाधिक कोरोना डोस आहेत. या दौऱ्या दरम्यान बांगलादेशची राजधानी ढाका आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या प्रवासी लोकलला मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

