Share

“…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल(१० जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी संपबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मात्र शरद पवारांना ही बैठक घेण्याचा संविधानिक अधिकार आहे का, असे सवाल आता भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. आता या बैठकीवरूनच भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनीही मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

‘शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Uddhav Thackeray) स्वतःचा चार्ज दिला आहे का ? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत? केवळ एकच निदान माफक अपेक्षा..’, असे ट्वीट करत राम कदम यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांसोबत ही बैठक झाली असून या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली. तसेच यावेळी महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र एसटी संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्याचा सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केला. त्यामुळे कामावर परत या, एसटी पूर्वपदावर आणा. सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!