🕒 1 min read
बीड : रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे(Ratnakar Gutte) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून यावेळी त्यांची बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने गुट्टेंची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून आता पुन्हा एकदा ईडीने ही कारवाई सुरु केली आहे. तसेच गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे.
गुट्टे यांनी शेतकऱ्यांची जवळपास ६३५ कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्यापैकी २५५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. तसेच या प्रकरणी काही दिवसांपूर्वी गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिल ची सुमारे १०० एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली होती. तद्पश्चात आता परळी-अंबेजोगाई रोडवरील वरवई गावातील गुट्टे यांची पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गुट्टे यांची गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रे आणि पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरिज, गंगाखेड सोलर पॉवरच्या परभणी, बीड आणि धुळ्यातील बँकांमधील सुमारे दीड कोटींची गुंतवणूक, तसेच गंगाखेड शुगर्सचे १ कोटींहून अधिक रुपयांचे समभाग अशी मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
