Share

महाराष्ट्र दिनानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या अनोख्या शुभेच्छा…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मास्टर ब्लास्टर’  म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. सचिनने त्याच्या वडिलांची एक कविता सर्वांसाठी शेअर केली आहे. तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

क्रिकेट क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सचिन तेंडुलकरचे वडिल रमेश तेंडुलकर हे मराठीमधील प्रसिद्ध लेखक होते. त्यांची कविता चाहत्यांसाठी सचिनने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सचिनने लिहिले की, ‘आज महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या वडिलांची एक कविता सादर करत आहे. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’

सचिन तेंडुलकरने नुकताच कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोना पिडीतांच्या मदतीसाठीही त्याने पुढाकार घेतला आहे. कोरोना सारख्या कठिण प्रसंगाच्या काळात यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साध्यापद्धतीने साजरा केला जातोय. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!