Share

कोरोनाचा हाहाकार पाहता भारतातील प्रवाशांना अमेरिकेतही बंदी

Published On: 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.

तसेच आता कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड, मालदीव यांच्यानंतर अमेरिकेनेही भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली. मागील 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या अमेरिका वगळता इतर देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 4 मे पासून हे निर्बंध लागू होणार आहेत. भारतातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाचे विविध स्ट्रोन कार्यरत असल्यामुळे अमेरिकेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

अमेरिकाने आपल्या नागरिकांसाठी, ग्रीन कार्ड असणाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदारासाठी तसेच 21 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्यांना निर्बंधामध्ये विशेष सूट दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लावलेले निर्बंध अनिश्चितकाळासाठी आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहे. शैक्षणिक, विद्यार्थी आणि पत्रकारांनाही यामध्ये विशेष सूट देण्यात आली आहे. जो बायडन म्हणाले की, ‘‘ मागील 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या अमेरिका व्यतिरित्क इतर नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आवा आहे.’’ आरोग्य आणि मानव मंत्रालय आणि रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं, बायडन यांनी सांगितले आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!