Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या ‘सूचना

Published On: 

नवी दिल्ली : भारतातातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असाच जर वाढत राहिला, तर हे रोखणे कठीण होऊ शकते.

यामुळे राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. त्याचबरोबर पुढे पंतप्रधान मोदी यांनी पुढे असे ही सांगितले कि, कोरोनाचा कहर असाच कायम राहिला, तर हि परिस्थिती हाताळणे अवघड होऊ शकते. आताच्या स्थितीतच कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे.

भीतीचे वातावरण निर्माण होऊ न देता. यातून जनतेला दिलासा द्यायला हवा त्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजे. मागील अनुभवातून शिकून नवीन गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे. देशात दररोज किमान ३० लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याने तसे प्रयत्न केले पाहिजे. तसेच राज्यांनी कोरोना लसीचा डोस फुकट जाणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले आहे.

मात्र या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे अनुउपास्थित होते. तर योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील प्रचारसभेत व्यस्त असल्याने ते देखील या बैठकीत अनुउपास्थित राहिल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!