जळगाव : १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी आता मोठी राजकीय खेळी रचली गेली आहे.
भाजपाचे विद्यमान महापौर सुनिल खडके, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह २५ हुन अधिक नगरसेवकांनी भाजपची साथ सोडण्याचा इरादा केल्याच्या चर्चा आहेत. कारण भाजपच्या जवळपास ३० नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा देण्याची तयारी केली आहे. हे सर्व नगरसेवक रविवार पासून शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ठाण्यातच वास्तव्यास आल्याचं समजत आहे.
त्यामुळे, ज्या प्रमाणे राज्यातील सत्ता स्थापनेवेळी राजकीय नाट्य रंगलं होतं, याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. जास्त संख्याबळ असून देखील भाजपची लाजगाव महापालिकेतील सत्ता जाऊ शकते. यामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच संकटात अडकल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडं, भाजपने मात्र नगरसेवकांची फूट रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला आहे. भाजपची उमेदवारी ऐनवेळी जाहीर केली जाईल. शिवसेनेसह भाजपने देखील सर्व नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. तसेच इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा देखील भाजपने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…मात्र महाराष्ट्र सरकार काही चेल्यांना हाताशी धरून वसुलीची योजना करतंय’
- ‘हा माणूस एक मशीन आहे, चिकू ऑन फायर’ ‘या’ अभिनेत्याने केला विराटवर कौतुकाचा वर्षाव
- तैमुर बनला कुक; आई करीनाने केले कौतुक
- मॅच फिक्सींग प्रकरणी कारवाईत आयसीसीकडून २ क्रिकेटपटूंवर ८ वर्षांची बंदी
- ‘एनआयए’ने सरकारला घाम फोडलाय हे नक्की, चित्रा वाघांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
