Share

मनसुख हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने केली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे सोबत ठाकरे सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आपण कालच हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले असून ठाकरे सरकारच्या वाझे गँग कडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत असल्याने हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमकी काय हेतू होता याची देखील चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!