🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरू आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार भाषांमध्ये ट्विट करत मतदारांना आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करा तसेच विशेषत तरुणांनी मतदान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी हे ट्विट चार भाषांमध्ये केले आहे.
Elections are taking place in Assam, Kerala, Puducherry, Tamil Nadu and West Bengal. I request the people in these places to vote in record numbers, particularly the young voters.
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2021
यामध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनल्याचे दिसून येत आहे.
পশ্চিমবঙ্গের যে সব জায়গায় আজ নির্বাচন হচ্ছে, সেখানকার ভোটদাতাদের বিপুল সংখ্যায় ভোট দেবার আবেদন জানাই। ভোট দিন আর গনতন্ত্রকে আরো শক্তিশালী করুন !
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2021
আজি যিহেতু অসমৰ তৃতীয় তথা অন্তিম পৰ্যায়ৰ নিৰ্বাচন আৰম্ভ হৈছে, আজি ভোটগ্ৰহণ হ'বলগীয়া আসনসমূহৰ বাবে বৃহৎ সংখ্যাত ভোটদান কৰিবলৈ মই আটাইকে অনুৰোধ জনাইছো।
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2021
കേരളത്തിലെ ജനങ്ങളോട്, പ്രത്യേകിച്ചു് സംസ്ഥാനത്തെ യുവാക്കളോടും ആദ്യമായി വോട്ട് ചെയ്യുന്നവരോടും റെക്കോർഡ് എണ്ണത്തിൽ വോട്ടുചെയ്യാൻ ഞാൻ അഭ്യർത്ഥിക്കുന്നു.
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2021
भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे. त्यामुळे आता या चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात जनतेचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?
- ‘कोरोना बाधित खेळाडू लवकरच संघात परततील’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- ‘ब्रेक द चेन’ या गोंडस नावाखाली बाजारपेठा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
