लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी बुधवारी दुपारी लखनऊमधील अमौसी एअरपोर्टवर आंदोलनाला बसले. प्रल्हाद मोदी म्हणाले की, त्यांच्या काही सहाकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अन्न-पाणी त्यागून उपोषणाचा इशारा दिला आहे. दिल्लीहून आलेल्या दोन वाजेच्या फ्लाइटने प्रल्हाद मोदी लखनऊमध्ये आले होते. त्यांचा तेथे जवळच्याच शहरात सत्कार होणार होता.
पोलिसांनी कार्यक्रमाच्या एका दिवसापूर्वीच आयोजकाला बनावट असल्याचे सांगून ताब्यात घेतले. यामुळे प्रल्हाद मोदी यांच्या सत्काराच्या दोन्ही कार्यक्रम रद्द झाले. यामुळे पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींनी आता त्यांचे ते समर्थक आणि आयोजकांना ताबडतोब सोडण्याची मागणी केली आहे. प्रल्हाद मोदी म्हणाले की, मला घ्यायला लोकं येणार होते, पण सर्वांनाच पोलिसांनी पकडून ठेवले आहे. त्यांच्या गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. त्यांना ताबडतोब सोडण्यात यावे, अन्यथा मी विमानतळावरच उपोषण सुरू करेन, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रल्हाद मोदी म्हणाले की, पोलीस अधिकारी म्हणतात की, पीएमओचा आदेश आहे. मी म्हणतो की, मला आदेशाची कॉपी दाखवा, जेणेकरून सत्य काय ते मलाही कळेल. पण गुंडागर्दी केल्याने ना येथील शासनाला लाभ होणार ना पीएमओला. ते म्हणाले की, मी आता इथून उठणारच नाही. जोपर्यंत पोलीस मला आदेशाची प्रत देत नाहीत, तोपर्यंत उठणार नाही. वेळ पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय अजूनही जिवंत असल्याचे दाखवून देईन.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

