मुंबई : 15 ऑगस्ट 1947 साली झालेल्या देशाच्या फाळणीच्या आठवणी ताज्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणावरुन शिवसेनेने चांगलंच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.
दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता. पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या. इंदिरा गाधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजं रोवली जाऊ नयेत, हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे, असं देखील सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जर्मनीचे विश्वविजेत्या फुटबॉल संघाचे खेळाडू गेर्ड मुलर यांचे निधन
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- अफगाणिस्तानचे खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार ; एसआरएचने दिली महत्वाची माहिती
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

