मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.
पदोन्नती आरक्षण, काँग्रेसची वारंवार नाराजी, स्वबळाचा नारा, आघाडीतील पक्षांमध्येच नेते-कार्यकर्ते यांची फोडाफोडी, निधी वाटप आदी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील तणाव वाढला असतानाच दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एकांतात चर्चा यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
यावर आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं आहे. ‘अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट झाल्याची चर्चा रंगली होती. पण कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवारांनी केला आहे. पंतप्रधान मोदी- उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढायची गरज नाही. या दोन्ही बैठकांमागे काहीही राजकारण नाही. मोदी हे पंतप्रधान असले आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी आजही मोदी हे ठाकरेंसाठी नरेंद्रभाई आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात असून मोदींनी पुढाकार घेतल्यास भाजप-शिवसेना हे दोन मित्रपक्ष एकत्र येणार का ? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘जर हे नागपूरमध्ये घडले असते, तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो’; नितीन राऊतांनी व्यक्त केला संताप
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी करत आहेत धडपड
- बारामतीच्या लता करे आजींना सोनू कक्करने दिली आर्थिक मदत
- अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

