Share

‘जर हे नागपूरमध्ये घडले असते, तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो’; नितीन राऊतांनी व्यक्त केला संताप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात दि. २४ जून रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलन करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर, शेकडो कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडली आहेत.

अखेर स्थानिकांच्या आक्रोशानंतर आणि पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तर, ऐन पावसाळ्यात घाईने करण्यात आलेल्या या कारवाईवर सर्वच पक्षीय नेत्यांनी नाराजी वर्तवली असतानाच ही कारवाई नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली याबाबत अनेक चर्चा शहरात सुरु आहेत. पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचा अप्रत्यक्ष आरोप विरोधकांकडून केला गेला.

दरम्यान, आज काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आंबिल ओढा परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कारवाईग्रस्तांशी चर्चा करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हा दलित समाजावरील अन्याय आहे, या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार. आंबिल ओढा परिसरात परवा भर पावसात ज्या पद्धतीने राक्षसी वृत्तीने, दंडेलशाहीने, या ठिकाणी या गरिबांची घरे तोडण्यात आली, उध्वस्त करण्यात आली. त्यांच्या घरातील सामान रस्त्यावर फेकण्यात आले. एवढच नव्हे तर महिलांना हात लावून, त्यांचे केस ओढण्यात आले. सर्व प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य असा आहे,’ असं राऊत म्हणाले.

‘जर माझ्या नागपूरमध्ये हे घडले असते, तर मी त्या रोडरोलरच्या समोर लोळून हे थांबवले असते. परंतु एकानेही हे काम केले नाही. महापालिकेला लाज वाटली पाहिजे, खऱ्या अर्थाने तिथल्या महापौर, पदाधिकाऱ्यांना त्यांनी हे थांबवले नाही. त्यांच्या अधिकारानुसार ते थांबवू शकले असते,’ अशा शब्दांत त्यांनी महापौरांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले, ‘मी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर, मला रहावले नाही. मला वाटले माझ्या कुटुंबांवर हा अन्याय झाला आहे. मी सरकारमध्ये असताना जर हे होतोय, तर मी कसा स्वस्थ बसू? मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली, काही महिलांच्या हातावर व्रण दिसून आले. हा निश्चतच दलित स्त्रियांचा अपमान करण्यात आला आहे. पुण्याच्या महापालिकेला, महपौर व पदाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. दलितांवर मोठा अन्याय झाला आहे. या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, ही मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!