मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यातून सरकारचे मंत्री सुद्धा वाचले नाहीत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर त्यांच्या आई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रश्मी ठाकरे या त्यांच्या निवासस्थानीच राहून कोरोनाचे उपचार घेणार असल्याची माहित मिळाली होती. त्यांनतर मात्र त्यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
यांनतर रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मोदी यांनी फोन करून रश्मी यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली असून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र या फोन नंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा आणि त्यांनतर आता सध्या राज्यात सुरु असलेले अंबानी यांच्या घराजवळील स्फोटक प्रकरण यामध्ये राज्यसरकारला विरोधाकांनी कोंडीत पकडले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रश्मी ठाकरे यांना फोन करणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

