Share

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांना देशापुढे झुकावेच लागणार- अजित नवले

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस. परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, कोरोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

येत्या तीन दिवसांत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रामधून आंदोलन सुरू केले जाईल आणि हे आंदोलन सर्वांनी दखल घेण्यासारखेच असेल. यापूर्वी देखील आम्ही नाशिक ते मुंबई पर्यंत पायी चालत आलो. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावीच लागली. त्यामुळे आमच्या आंदोलनापूर्वी केंद्राने दखल घ्यावी, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना देशापुढे झुकावेच लागणार आहे. तसेच मागील २० दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींसाठी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पण तो पाठींबा बाहेरुन दिला असल्याने त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील नवले यांनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!