नवी दिल्ली: कोरोना नंतरच्या काळात देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. तर लसीकरण सुरू होण्याच्या बातमीने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे लोकांकडून अनेक प्रकारच्या खरेदी केल्या जात आहे. तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी देखील केली जात आहे. मात्र या दरम्यान टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किंमती वाढल्याची बातमी आली आहे.
मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा पाठोपाठ टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा माल असलेले स्टील, मौल्यवान धातू आणि सेमीकंडक्टरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकणे भाग पडल्याचे टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या वाहनांच्या किमती किरकोळ रकमेपासून २६ हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत.
टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किंमती२० हजार रुपयापर्यंत वाढविल्याचे जाहीर केले आहे. उत्पादन आणि सेमीकंडक्टरचा खर्च वाढल्याने टाटा मोटर्सने किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ग्राहकांनी २१ जानेवारीपूर्वी वाहनाच्या खरेदीसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना ही दरवाढ लागू होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. टाटा मोटर्स प्रवासी वाहनांच्या श्रेणीत हॅचबॅक टियागो (किंमत ४.७ लाखांपासून पुढे ) ते एसयूव्ही हॅरीयर (१९.१ लाख-एक्श शोरुम दिल्ली) अशा वाहनांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात गेल्या ३३ तिमाहीच्या तुलनेत वाहन विक्रीत मोठा उच्चांक नोंदविला आहे.
मारुती सुझुकीने सोमवारी काही निवडक मॉडेलच्या किमती ३४ हजार रुपयापर्यंत वाढविल्या आहेत. मारुती सुझुकीनेही उत्पादन खर्च वाढल्याने किमती वाढण्यामागे कारण सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- रोजच्या जेवणात पनीरचा समावेश करताय ना; मग जाणून घ्या फायदे
- राज्यात आगामी लोकसभेच्या पाच खुल्या जागांवर भाजप SC, ST उमेदवार देणार- चंद्रकांत पाटील
- महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश मिळतेच – बाळासाहेब थोरात
- खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत
- पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण… अजितदादांना राणेंचा टोला

