Share

पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण… अजितदादांना राणेंचा टोला

Published On: 

पुणे : पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. आम्हाला ज्यावेळी लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू , असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा?? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेविषयी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन, असे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!