Share

राज्यात आगामी लोकसभेच्या पाच खुल्या जागांवर भाजप SC, ST उमेदवार देणार- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी:- २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाच खुल्या जागांवर एससी, एसटी प्रवर्गाचे उमेदवार भाजप उभे करणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा गौरव दिन म्हणून राज्य सरकार साजरा करेल ना करेल, पण भाजप, मात्र त्यांची आगामी जयंती (१५ नोव्हें.) गौरव दिन म्हणून साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानिमित्त पक्षाचे लाखो कार्यकर्ते आपल्या घरात बिरसा मुंडा यांचा फोटो लावून त्यांना नमन करतील, असेही त्यांनी जाहीर केले.

भाजपच्या प्रदेश अनुसूचित जनजाती तथा आदीवासी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकनिमित्त भोसरीत आयोजित मेळाव्यात चंद्रकांतदादा बोलत होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उदघाटन केलेल्या या मेळाव्याचा चंद्रकांतदादांच्या हस्ते समारोप झाला. शहराच्या महापौर माई ढोरे, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री डॉ.प्रा.अशोक ऊईके, शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, पूजा लांडगे, स्थानिक नगरसेवकांसह राज्यातील आदीवासी आमदार, खासदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!