Share

खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग 30 बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. 50 वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे होणार आहे.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड 19 मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!