औरंंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारत फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करुन शिक्षकाला २५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तोतया निजामाच्या वशंजाला शनिवारी (दि.१९) बेड्या ठोकल्या. दिलशाद जहा ईमदाद जहा (वय ५७, रा. तेजा कॉलनी, लक्ष्मी नगर, अलकापुर हैदराबाद ह.मु. हडको कॉर्नर औरंगाबाद) असे अटकेत असलेल्या तोतया निजामाचया वंशजाचे नाव आहे.
मोहम्मद नदीम सलीम पाशा (वय ४६, रा. भडकल गेट) हे शिक्षक असून दिलशाद जहा याची ओळख हैदराबादचे नातेवाईकाच्या माध्यमातुन झाली होती. दिलशाद जहॉ याने हिमायत बाग येथे आपल्या मालकीची चारशे एकर जमीन आहे. त्याच्यावर जमीर पटेल नावाच्या व्यक्तीने कब्जा केल्याचे मोहम्मद नदीम सलीम पाशा यांना सांगितले. तसेच जमीनीच्या मालकी विषयीची कागदपत्रे नदीम पाशा याच्या मोबाईलवर व्हॉटसअपवर शेअर केले. यात भारताचे राष्ट्रपती व गृह सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केलेल्या कागदपत्रांचा समावेश होता. तसेच यामध्ये दिलशाद जहॉ हे निजामाचे कायदेशिर वारस असल्याचा उल्लेख होता. यानंतर दिलशाद याने वेळोवेळी अडचणी सांगून नदीम पाशा याच्याकडून पैसे घेतले. आधी दहा लाख रूपये घेतल्यानंतर त्याने पैसे परत करण्याऐवजी त्यांना हिमायत बागेतील एक एकर जागा २५ लाखात देतो असे सांगितले.
दरम्यान, दिलशाद जहा हा फसवणूक करणारा आहे. असे कळाल्यानंतर नदीम पाशा याने दिलशाद जहां याला निजाम वारसदाराबाबत कागदपत्रे मागितली असता, त्याने दिली नाही. यामुळे दिलशाद याने दिलेली जमीनीबाबत अधिक शोध घेतला असता, ही जमीन सव्हे नंबर १०४ ही जमीन फळ संशोधन केंद्राची असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी दिलशाद जहा याला संपर्क केला असता, त्याने सुपारी किलरच्या माध्यमातून नदीम पाशा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

