🕒 1 min read
नवी दिल्ली : प्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए आणि ईडी यांनी अटक केली. यानंतर पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांने इतर ठिकाणी देखील छापेमारी केली असून अनेकांना अटक केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्रालयाने पिएफआयवर ५ वर्षांसाठी भारतात बंदी घातली आहे. मात्र या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी ‘मिशन 2047’ शी संबंधित आयईडी, माहितीपत्रक आणि सीडी कशी बनवायची यावरील अभ्यासक्रम तसेच इतर साहित्य एजन्सींची माहिती चौकशीमध्ये समोर आलं असून दोषींकडून पुरावे आणि बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
पीएफआय संघटनेने आर्थिक नेटवर्क उभे केले होते. त्यासाठी खाती काढण्यात आली होती. त्यामध्ये गोपनीयरित्या पैसा जमा केला जात असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. ही संघटना सायलेंट किलर म्हणून काम करत होती. या संघटनेच्या माध्यमातून दुष्प्रचार सुरू होता. त्यांच्या कुरापतीचे पुरावे यंत्रणांना मिळाले होते. त्यामुळे या संघटनेशी सबंधित संस्थांवरही मोठी कारवाई करण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या कटेच्या रडावर होते. केरळ मधून आटक केलेल्या आरोपीच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis on PFI : पीएफआय ही संघटना ‘सायलंट किलर’, बंदी योग्यच; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Lalu Prasad Yadav | PFI नंतर RSS वर बंदी घाला – लालूप्रसाद यादव
- MNS | मनसे नेत्याने केली पंकजा मुंडेंची पाठराखण! म्हणाले, “भाजप सरकार सत्तेत आल्यापासून…”
- Bharat Gogawale | पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार ; भरत गोगावले यांना विश्वास
- Nana Patole | “संघाचा पंतप्रधान, संघाचाच भाजपाध्यक्ष, हे चालतं का?” ; नाना पटोलेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
