नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
त्यात आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रीति जिंटा आणि सोनम कपूर हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री प्रीति झिंटाने ट्विटच्या माध्यमातून शेतक-यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ‘इतक्या थंडीतही हे शेतकरी आंदोलनास बसले आहेत. ते आपल्या मातीचे सैनिक आहेत जे आपल्या धान्याने आपला देश चालवतात. मला आशा आहे की शेतकरी आणि सरकार यांच्या झालेल्या चर्चेतून चांगले परिणाम समोर येतील आणि शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागतील’ असे ट्विट प्रीतिने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात दिल्लीप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच ?
- घराबाहेर बॅरिकेट्स लावत अखिलेश यादवांना शेतकरी आंदोलनात सामील होण्यापासून रोखलं !
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- शरद पवारांनीच शेतकरी हितासाठी खाजगीकरणाला पाठिंबा दिला होता- भाजप

