🕒 1 min read
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर मातांना लस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालयात आजपासून लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १२ हजारापेक्षा अधिक गरोदर मातांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे.
गरोदर मातांना कोविड- १९ आजार झाल्यास त्याची तीव्रता इतर महिलांपेक्षा अधिक असते. तसेच गरोदर मातांसह तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही आजारामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्ता असते. यामध्ये कमी कालावधीत प्रसूती होणे, प्री एक्लामशिया, सिझेरियनची शक्यता वाढणे, अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता लाणे, माता मृत्यू किंवा नवजात बालकाचा मृत्यू होणे आदी गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. ज्या गरोदर मातांना मधूमेह, दमा, सिकलसेल आजार, हृदयविकार, किडनीचा आजार असे काही आजार असल्यास कोविडमुळे धोका होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सर्व गरोदर मातांना कोविड- १९ प्रतिबंधक लस देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वीच्या लसीकरण मोहिमेतून गरोदर मातांना वगळण्यात आले होते. सध्या उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी गरोदर मातांना देण्यासाठी सुरक्षित असून या कोरोना प्रपतिबंधक लसी दिल्यामुळे गरोदर मातांना इतर लाभार्थींप्रमाणे कोविडपासून संरक्षण मिळते.
कोरोनाच्या बचावासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याने अधिकाधिक लसीकरण व्हावे, ही शासनाची भुमिका आहे. लसीमुळे संरक्षण मिळतेच जरी कोरोना झाला तरी आजाराची तीव्रता कमी राहत असल्याचे आजवरच्या पाहणीतून पुढे आले आहे. प्रतिबंधक लस या अगोदर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, १८ वर्षांवरील नागरिक, स्तनदा माता यांच्या करिता यापूर्वीच सुरु केली आहे. आता ही लस गरोदर मातांना देखील देण्यात येणार आहे.
पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान मधुन गरोदर माताना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गरोदर मातांनी देखील स्वतःचे व होणाऱ्या बाळाचे आजारापासून संरक्षण होण्याकरिता ही लस घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्यासाठीच कराडांना मंत्रिपद’, ‘सामना’तून शिवसेनेचा दावा
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी
- बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया
- मराठवाड्यात दमदार पाऊस; पिके बहरणार, मशागतीच्या कामांना वेग येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

