मुंबई : काल एसटी कामगार आक्रमक होत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर धडकले होते. यात एसटी कामगार यांनी शरद पावर यांच्या निवासस्थानावर बाटल्या व चपला फेकल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी एसटी कामगारांना शांततेचं आवाहन केलं होतं. चर्चेची तयारी दर्शवली होती.
आता यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे. पडळकर म्हणाले, “ज्या दिवशी आम्ही या आंदोलातून बाहेर पडलो, २६ नोव्हेंबर २०११ ला, तेव्हापासून पर्वा निकाल येईपर्यंत वेगळं काही घडलंच नाही. एसटी कामगारांना आम्ही विनंती केली होती कि या पेक्षा काहीच वेगळा घडणार नाही, कर्मचारांच्या भावना तीव्र होत्या.”
पडळकर पुढे म्हणाले की, “नंतरच्या काळात सरकार आणि एसटी कामगार यांच्यात कोणतीही सहमती झाली नाही. सरतेशेवटी कामगारांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेने गेलं.
महत्वाच्या बातम्या :


