🕒 1 min read
मुंबई: कार्यालयात जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार का, याकडे डोळे लावून बसणाऱ्या चाकरमान्यांची रविवारी साफ निराशा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या संवादातून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांचा हा संवाद म्हणजे केवळ बोलाची कढी बोलाचा भात आहे, ते फक्त वक्तव्ये करतात, कृती मात्र कुठे दिसत नाही, अशी टिका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल केली.
लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना, मला गर्दी नको, त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करणार नाही असं मुख्यमंत्री सांगत आहेत; पण तुम्हाला काय हवे हे महत्त्वाचं नाही; तर जनतेला काय हवं आहे याचा कधीतरी विचार करा असा टोला दरेकर यांनी लगावला. नकारात्मक संवाद नको काही तरी सकारात्मक गोष्टीची अपेक्षा आहे; असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- Bihar Election 2020 : भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी-फडणवीस

