Share

‘मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?’, दरेकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात सोमवारपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकाने, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाहीय.

गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच टप्पे सध्या ठऱवण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. मात्र, प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासन काढणार आहे.

दुसरीकडे सरकारच्या या नियमावलीत प्रार्थनास्थळे उघडणार की नाही याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावरून सरकारला धारेवर धरलंय. राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं.

अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?, असा सवाल दरेकर यांनी केला आहे. वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!