Share

प्रवीण दरेकरांची याचिका कोर्टाने फेटाळली; बोगस मजूर प्रकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने दाखल केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याप्रकरणी दरेकर यांनी न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावली आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचे दाखवत मुंबै बँकची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचिका फेटाळल्याने दरेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता दरेकर पुढे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मजूर असल्याचे भासवून मुंबै बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनीही मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांना अपात्र घोषित केले आहे. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यातील अधिकारी गुन्हा दाखल करण्यास मुद्दाम टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे अखेर दोन महिन्यानंतर या बोगस मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!