Share

बिहारपासून सुरुवात..! प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष काढणार?, twitter वर दिले संकेत

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेससोबतच्या अयशस्वी चर्चेनंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत. सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांनी आपल्या दशकभरातील अनुभव सांगितला आणि बिहारमधून नवी ‘सुरुवात’ करण्याबाबत बोलले. काँग्रेससोबत झालेल्या दीर्घ बैठकीनंतर, किशोर यांनी पक्षाची ऑफर नाकारल्याचे सांगितले होते.

प्रशांत किशोर यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरणाला आकार देण्याचा हा 10 वर्षांचा प्रवास आहे. आता मी नव्याने सुरुवात करणार आहे, खरी काम करण्याची, लोकांपर्यंत पोहोचण्याची, समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि ‘जन सूरज’च्या मार्गावर जाण्याची हीच वेळ आहे.” त्यांनी ट्विटच्या शेवटी लिहिले की, “बिहारपासून सुरुवात करु”. त्यामुळे त्यांच्या ट्विटवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, ते इतर कोणत्याही पक्षासाठी रणनीती बनवण्याऐवजी वेगळा राजकीय पक्ष काढू शकतात.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलेले ‘जन सूरज’ हे त्यांच्या नव्या पक्षाचे नावही असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांचा पक्ष पूर्णपणे आधुनिक असेल. डिजिटल माध्यमातून लोकांशी जोडण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामध्ये प्रशांत किशोर देखील विशेष आहेत. याआधी प्रशांत किशोर यांनी भाजप, जेडीयू, टीएमसी, काँग्रेससह अनेक पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!