मुंबई: राज्यात शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा चांगलाच फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचा घास गेला आहे. पहिला पाऊस उशीरा झाल्यामुळे पेरणीला देखील उशीर झाला, खरीपाचं पीक तोंडावर असताना आलेले वादळ आणि त्याच सोबत ओला दुष्काळ त्यामुळे कापणीला आलेले पीक तेही पाण्यात सडले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र यावर सरकारने कुठलीही मदत केली नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नाही आणि मुख्यमंत्रीही वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाही. मळणीच्या व कापणीच्या वेळेस शेतकऱ्यांना विजेची गरज असते नेमकं याच वेळी विजेचे कनेक्शन तोडले जात असल्याचा आरोप देखील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
दोन-दोन चार-चार वर्षामागील वीजबील, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणे, यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबिलासंदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं ठेकाच जणू या ‘महाभकास’ आघाडीनं घेतला आहे. या सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- माजी खेळाडूने भारतीय संघातील मधल्या फळीवर उपस्थित केला प्रश्न
- ‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
- चार वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘ही’ परीक्षा तातडीने घ्या; युवासेनेची मागणी
- एकदिवसीय-टी20 साठी हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?
- ‘राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

