Share

‘आम्ही शिवसेनेला त्यांची जागा दाखवू’; प्रसाद लाड कडाडले

Published On: 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेला. काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली होती. या परिसरात बराच काळ तणावाची परिस्थिती होती.

दरम्यान, या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना इशारे देत असून भाजप नेत्यांनी पोलीस स्टेशन गाठून शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल होईपर्यंत माहीम पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडला होता.

अखेर एफआयआर करून पोलिसांनी योग्य कारवाईच आश्वासन दिल्यानंतर हे सर्व नेते बाहेर पडले. यानंतर, प्रसाद लाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्या भाजप कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. भविष्यात असे काही झाल्यास जशास तसे उत्तर मिळेल!’ असा इशारा त्यांनी दिलाय.

पुढे प्रसाद लाड म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजप भक्कम उभी आहे. भाजप कार्यकर्त्यांवर आणि आमच्या भगिनींवर हल्ला करणाऱ्यांवर उचित कलम लावण्यात आले आणि FIR दाखल झाला! आणि नंतरच आम्ही माहीम पोलीस स्टेशन मधून बाहेर आलो.’

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!