सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
दरम्यान,या पाण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.उजनी धरणाच्या 5 टीएमसी पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला असून उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’, अशी भूमिका सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे.
दरम्यान, नुकतेच उजनीच्या पाण्यावरुन महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात पोलिसांना चकवा देत शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांनी जलसमाधी आंदोलन केलं. पाच टीएमसी सांडपाणी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यात देण्याचा निर्णय झाला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातून याला प्रचंड विरोध सुरु झाला असून सर्वपक्षीय नेत्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना नेत्यांनाच प्रसिद्धीची हौस, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जमवली गर्दी
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- भाजपच्या आमदार आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांची कोविड सेंटरवर धक्काबुक्की
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

