बीड : राज्यासह मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध निर्बंध लावले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजारपेठा बंद आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, सभा घेणे किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, असे असताना शिवसेना नेत्यांनी मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचेच दिसून येतय. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या सेवेच्या नावाखाली नेत्यांनी अशीच प्रसिद्धीची हौस पूर्ण करुन घेतली. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी अंथरवणपिंप्री गावात कोव्हीड केअर सेंटर सुरू केले. या सेंटरचे उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, या उद्घाटन समारंभात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या शासनाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवण्यात आली होती.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित, सुरेश नवले, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर अशा दिग्गजांची उपस्थिती होती. असे असतांना सभेला गर्दी जमवावी अशी गर्दी या कार्यक्रमाला जमवण्यात आली होती. या कार्यक्रमात नेत्यांनी जरी मास्कचा वापर केलेला असला तरी अनेक कार्यकर्त्यांना त्याचा विसर पडलेला दिसून आला.
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
