Share

पाकिस्तानच्या संघाची चिंता वाढवणारी बातमी; कर्णधार बाबर विरोधात एफआयआर दाखल

Published On: 

मुंबई : पाकिस्तानच्या संघाचे मागील काही दिवसापासुन प्रदर्शनात काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसुन येत आहे. नुकत्याच आयसीसी अतंरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल पाच खेळाडूमध्ये समाविष्ट आहे. आगामी विश्वचषकाच्या अनुषंगाने पाकीस्तानचा संघ तयारीला लागला आहे. मात्र यादरम्यान पाकिस्ताच्या संघाची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानमधील एका न्यायालयाने महिलेचा छळ केल्याप्रकरणी पाकिस्ताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हामिजा मुख्तार या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावनी होती. यावेळी न्यायाधीश हामिद हुसैन यांनी एफआयए या चौकशी करणाऱ्या यंत्रणेला एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित महिलेने केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या कर्णधाराने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश पाठवले.

यासंदर्भात हमिजा मुख्तारने सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली. संबंधित विभागाने चौकशी केल्यानंतर ज्या नंबरवरून हमिजा यांना धमकी दिली गेली त्यापैकी एक नंबर बाबर आझम याचा होता. आता पर्यंत बाबरकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!