नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही, असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी केलं.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलं. या परिस्थितीबाबत बोलताना फारुक अब्दुल्ला म्हणाले, ‘परिस्थितीच अशी आहे की कुणी हात मिळवताना किंवा गळाभेट घेतानाही घाबरतो आहे. इतकंच काय मी माझ्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकत नाही. मनात असूनही गळाभेट घेऊ शकत नाही.
अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यावर तिथं उपस्थित असलेले सर्वच लोक पोट धरुन हसत सुटले. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याची एक व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे. सोशल मिडीयावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
- ‘राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थोरात एक शब्दही बोलत नाहीत,कृषी कायद्यावर मात्र छाती फाडुन बोलतात’
- कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, खासदार रक्षा खडसे यांचा दावा
- कसं जनता म्हणेल तसं! विखे पाटलांच्या २० वर्षाच्या सत्तेला सुरुंग
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
